पुणे विद्यापीठातील भोजनगृहांच्या दरात वाढ; विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा
पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) विद्यापीठातील सर्व भोजनगृहांमधील (मेस) भोजनाचे दर प्रति थाळी १० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. महागाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर
University Pune SPUU


पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) विद्यापीठातील सर्व भोजनगृहांमधील (मेस) भोजनाचे दर प्रति थाळी १० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. महागाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याने ‘विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ने या दरवाढीला विरोध केला आहे. मेस चालकांना वाढत्या अन्नधान्य, खाद्यतेल, एलपीजी गॅस तसेच कामगारांच्या वेतनाचा वाढलेला खर्च सहन करावा लागत असल्याने दरवाढ करण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, वाढीव १० रुपयांचा भार विद्यार्थ्यांवर न टाकता विद्यापीठाने संबंधित मेस चालकांना अनुदानाच्या स्वरूपात ही रक्कम द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे. राज्यातील अनेक भाग सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती तसेच महाडीबीटीचे लाभ अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मेसच्या दरात वाढ करून त्यांच्यावर आणखी आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे समितीने म्हटले आहे.मेस चालकांचा वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याऐवजी विद्यापीठाने स्वतःच्या स्तरावर आर्थिक तरतूद करावी, अशी भूमिका विद्यार्थी संघर्ष कृती समितीने घेतली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande