
छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्ह्यात २३ नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी वसमत मतदारसंघात १२, कळमनुरीत ८ आणि हिंगोलीत ३ नवीन मतदान केंद्रांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या एक हजार १५ वरून एक हजार ३८ झाली आहे.
मतदारसंघनिहाय मदत कक्ष
मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. वसमतसाठी ९०६७४ १०८१३, कळमनुरीसाठी ९०९६७ ४३१४२, तर हिंगोलीसाठी ९४०४५ ०६९१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. जिल्हास्तरीय मदत क्रमांक १९५० आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis