आपच्या सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार
सोलापूर, २ सप्टेंबर (हिं.स.) : आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. पक्ष संघटनेचा विस्तार करताना महिला शक्तीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाच्
Ksks


सोलापूर, २ सप्टेंबर (हिं.स.) : आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. पक्ष संघटनेचा विस्तार करताना महिला शक्तीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आम आदमी पार्टीकडून महाराष्ट्रासह सोलापूर शहरात संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्ताराचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील महिला आघाडी अधिक सक्षम करण्यासाठी तसेच महिलांना पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोनिका सरकार पवार यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोनिका पवार यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रकाशची जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश संघटक सागर पाटील तसेच सोलापूर शहराध्यक्ष निलेश संगेपान यांनी अभिनंदन केले.

या निवडीमुळे सोलापूर शहरातील आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोनिका पवार सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande