पुणे - कृषी खात्याच्या नवीन आकृतीबंधाविरोधात 'ॲग्रिकॉस'चे लेखणी बंद आंदोलन
पुणे, 02 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य सरकारने राज्याच्या कृषी विभागाचा मंजूर केलेला अतांत्रिक आकृतीबंध तत्काळ रद्द करावा आणि यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात यावी, या मागणीसाठी येत्या गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) लेखणी बंद आंदोलन करण्या
पुणे - कृषी खात्याच्या नवीन आकृतीबंधाविरोधात 'ॲग्रिकॉस'चे लेखणी बंद आंदोलन


पुणे, 02 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य सरकारने राज्याच्या कृषी विभागाचा मंजूर केलेला अतांत्रिक आकृतीबंध तत्काळ रद्द करावा आणि यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात यावी, या मागणीसाठी येत्या गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा ॲग्रीकॉस या कृषी विद्यापीठ पदवीधर संघाने दिला आहे.

या आकृतीबंधासाठीच्या तज्ज्ञ समितीत उच्चस्तरीय निवृत्त सनदी अधिकारी,कृषी विद्यापीठातील निवृत्त तज्ज्ञ आणि राज्याच्या कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात करून पुन्हा नव्याने हा आकृतीबंध तयार करण्याची मागणी या संघाचे अध्यक्ष ॲड. अनंत चोंदे यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande