लॉजिस्टिकच्या वेअर हाऊसमधून १४ लाखांच्या स्पेअर पार्ट्सच्या बॉक्सची चोरी
नाशिक, 02 सप्टेंबर (हिं.स.)। - त्र्यंबकेश्वर रोड येथे असलेल्या एका ट्रान्स्पोर्टच्या वेअर हाऊसमध्ये असलेले १४ लाख २२ हजार रुपये किमतीचे स्पेअर पार्ट्सचे बॉक्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अ
लॉजिस्टिकच्या वेअर हाऊसमधून १४ लाखांच्या स्पेअर पार्ट्सच्या बॉक्सची चोरी


नाशिक, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

- त्र्यंबकेश्वर रोड येथे असलेल्या एका ट्रान्स्पोर्टच्या वेअर हाऊसमध्ये असलेले १४ लाख २२ हजार रुपये किमतीचे स्पेअर पार्ट्सचे बॉक्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुभाष कमलाकर पाटील (रा. शांती प्राईड अपार्टमेंट, कामटवाडा) हे त्र्यंबकेश्वर रोडवरील ओम् साईराम लॉजिस्टिक ट्रान्स्पोर्टचे काम पाहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीत

म्हटले आहे, की दि. १० ते ३१ ऑगस्टदरम्यान अज्ञात चोरट्याने ओम् साईराम लॉजिस्टिक ट्रान्स्पोर्टच्या वेअर हाऊसमध्ये प्रवेश करून शाफ्ट अॅसेम्ब्ली लोअरचे ३ लाख ४९ हजार ६४८ रुपये किमतीचे पार्टचे ३६ बॉक्स,

७ लाख ६३ हजार ५८० रुपये किमतीचे आणखी एक स्पेअर पार्टचे ७२ बॉक्स व ३ लाख ९ हजार ४२७ रुपये किमतीचे अन्य बॉक्स असे एकूण १४ लाख २२ हजार ६५५ रुपये किमतीचे स्पेअर पार्टचे बॉक्स लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande