स्टेनो पद बरखास्त करण्याचा निर्णय अन्यायकारक!
नांदेड, 02 सप्टेंबर (हिं.स.)। स्टेनो पात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. स्टेनो हे पद बरखास्त केल्यामुळे स्टेनोची पात्रता मिळवून शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय
अ


नांदेड, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

स्टेनो पात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

स्टेनो हे पद बरखास्त केल्यामुळे स्टेनोची पात्रता मिळवून शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी शासनाने खेळू नये.

स्टेनो पात्र विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. असे सांगण्यात आले आहे.

शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन स्टेनो पदाबाबत योग्य निर्णय घ्यावा आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.

विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही,

न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही! असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने म्हंटले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande