
परभणी, 02 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन त्यांनी सादर केले आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्न म्हणजे जून-जुलै महिन्यातील अत्यल्प व खंडित पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रद्द केलेले ४ ट्रिगर पूर्ववत करून शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ मिळावा तसेच मराठवाड्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली. यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि आमदार मनोज कायंदे उपस्थित होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis