जरांगे उपोषणावर आमदार विटेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
परभणी, २ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश विटेकर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पव
अ


परभणी, २ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश विटेकर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसंदर्भात सविस्तर निवेदन साद केले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राजकीय विषय नसून, लाखो मराठा बांधवांच्या भवितव्याशी तसेच त्यांच्या पुढील पिढ्यांच्या आकांक्षांशी संबंधित संवेदनशील विषय आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी आमदार विटेकर यांनी केली.

मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक आणि ठोस निर्णय घेण्यात यावा, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा करून त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

मराठा समाजाच्या मागण्यांवर न्याय्य तोडगा निघावा, आंदोलनाची तीव्रता वाढू नये आणि समाजातील तरुणांच्या भवितव्याला योग्य दिशा मिळावी, यासाठी शासनाने संवेदनशीलतेने आणि सकारात्मक भूमिकेतून पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार विटेकर यांनी यावेळी नमूद केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande