वेरूळ येथे 'वेरूळ महोत्सव' आयोजित करण्याचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निर्देशानुसार, ‘अजिंठा-वेरूळ महोत्सव’ दरवर्षी आयोजित करण्यासंदर्भात यावेळी वेरूळ येथे ''वेरूळ महोत्सव'' आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकां
वेरूळ येथे 'वेरूळ महोत्सव' आयोजित करण्याचे नियोजन


छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निर्देशानुसार, ‘अजिंठा-वेरूळ महोत्सव’ दरवर्षी आयोजित करण्यासंदर्भात यावेळी वेरूळ येथे 'वेरूळ महोत्सव' आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने आगामी तीन वर्षांतील महोत्सवांचे वेळापत्रक आतापासूनच निश्चित करण्याचे नियोजन असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री.गौडा यांनी दिली.

बैठकीत पर्यटन संस्था, हॉटेल व्यावसायिक, प्रवास संस्था, सहली आयोजक तसेच इतर भागधारकांनी पर्यटन विकासासाठी विविध सूचना व मते मांडली. पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांनी शासकीय विभाग आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी परस्पर सहकार्य व समन्वय साधून पर्यटनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास, पर्यटनस्थळांची व पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था, पायाभूत सुविधा, स्वच्छता तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या विविध अडचणी सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ-घृष्णेश्वर परिसरात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही आढावा घेण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande