
नांदेड, 02 सप्टेंबर, (हिं.स.) समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत नांदेड शहरात तयार होत असलेल्या वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट दरम्यानच्या पुलाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेत महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. सदरील पुलाचे काम करत असताना घ्यावयाच्या विविध उपाययोजना आणि आवश्यक खबरदारीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट दरम्यान होणारा हा पूल शहराच्या दळणवळणाच्या आणि भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, या पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू असताना स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी पुढाकार घेत या विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis