सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम - गिरीश महाजन
नाशिक, 20 सप्टेंबर (हिं.स.)। - राज्यामधील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम असून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे ते म्हणाले की धरणातील उपलब्ध पाणी प्रथम पिण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवले जा
Preparations for the flag hoisting


नाशिक, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

- राज्यामधील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम असून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे ते म्हणाले की धरणातील उपलब्ध पाणी प्रथम पिण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत अन्य वापराबाबतचा निर्णय हा नंतर घेतला जाणार आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावरती असून ते बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की राज्यामध्ये प्रभाव हा कायम असल्यामुळे पाऊस कमी प्रमाणात झाला त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे पिके धोक्यात आलेली आहेत दुष्काळी भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सुरुवातीपासूनच पाऊस लांबल्यामुळे पेरणी देखील उशिरा झाल्याचे सांगून ते म्हणाले की अल्प पावसामुळे पिके धोक्यात आली म्हणूनच आता पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्यात सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देताना पुढे म्हणाले की या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी एकात्मिक नदी जोड प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या माध्यमातून विदर्भातील आठ जिल्ह्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची योजना असून त्यातून 10 लाख हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होईल उद्योगांनाही पाणी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande