पावसाळ्यानंतर प्रथमच नाशिकचे तापमान 31.9 डिग्री वर, रविवार ठरला गर्मीचा दिवस
नाशिक, 20 सप्टेंबर (हिं.स.)। - पावसाळ्यानंतर सर्वात प्रथम नाशिक जिल्ह्याचे तापमान 31.9 डिग्री सेल्सिअस वरती गेले असून सप्टेंबर महिन्याच्या मध्यामध्ये तापमान वाढल्याने नागरिकांना गर्मीचा त्रास रविवारी सहन करावा लागला. जिल्हा सर्वत्र गणेशोत्सवाची
पावसाळ्यानंतर प्रथमच नाशिकचे तापमान 31.9 डिग्री वर, रविवार ठरला गर्मीचा दिवस


नाशिक, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

- पावसाळ्यानंतर सर्वात प्रथम नाशिक जिल्ह्याचे तापमान 31.9 डिग्री सेल्सिअस वरती गेले असून सप्टेंबर महिन्याच्या मध्यामध्ये तापमान वाढल्याने नागरिकांना गर्मीचा त्रास रविवारी सहन करावा लागला.

जिल्हा सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना सुरू झालेल्या सप्टेंबर ऑक्टोंबर हिटचा रविवारी नाशिककरांना वाढत्या गर्मीचा त्रास सहन करावा लागला. सन 26 मध्ये नाशिक जिल्ह्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती उष्णतेचा सामना करावा लागला होता नाशिक जिल्ह्याचे तापमान हे 33 - 34 अंश डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचलेले होते . त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यामुळे तापमान कमी होत गेले .आता चालू वर्षातील सप्टेंबर - ऑक्टोबर हिट सुरू झाल्यानंतर मागील आठवड्यामध्ये नाशिकचे तापमान हे 31 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मात्र नाशिकचे तापमान हे 28 -29 डिग्री सेल्सिअस पर्यंत कायम होते.

पण रविवारी 20 सप्टेंबर रोजी म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या मध्यवर्ती तारखेला नाशिकचे तापमान पुन्हा एकदा वाढले असून रविवारी सायंकाळी दोन मिनिट झालेले किमान तापमान हे 31.9 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर प्रथमच एवढे तापमान नोंदविण्यात आले आहे त्यामुळे रविवारी नाशिककरांना गर्मीचा त्रास सहन करावा लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande