पंतप्रधानांकडून भारतीय नेमबाजांचे अभिनंदन
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले कौतुक नवी दिल्ली, 20 सप्टेंबर (हिं.स.) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावणाऱ्या सोनम उत्तम मस्कर, एलावेनिल वलारिवान आणि विदर्शा के. विनोद यां
पंतप्रधान नरेंद्र मोदी


आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले कौतुक

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर (हिं.स.) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावणाऱ्या सोनम उत्तम मस्कर, एलावेनिल वलारिवान आणि विदर्शा के. विनोद यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. भारतीय नेमबाजांच्या या कामगिरीचे कौतुक करताना मोदी यांनी त्यांचे यश भविष्यातील अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, कठोर परिश्रम आणि सांघिक प्रयत्नांमुळे उत्कृष्ट निकाल मिळाला आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवून देणाऱ्या सोनम उत्तम मस्कर, एलावेनिल वलारिवान आणि विदर्शा के. विनोद यांच्या कामगिरीचा देशाला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या एलावेनिल वलारिवानचेही पंतप्रधानांनी विशेष अभिनंदन केले. भारतीय नेमबाजांची देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी सुरू असल्याचे मोदी यांनी म्हटले.

एलावेनिल वलारिवान हिने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या याच दिवशी दुसरे पदक पटकावल्याने तिचा विजय अधिक विशेष ठरला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तिच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.भारतीय नेमबाजांच्या या यशामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडली असून, त्यांच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande