क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवियांकडून जपानमध्ये 'संडेज ऑन सायकल'च्या 91 व्या आवृत्तीचे नेतृत्व
नागोया(जपान), 20 सप्टेंबर (हिं.स.)केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जपानमधील नागोया येथील मेईजो पार्क येथे ''संडेज ऑन सायकल''च्या 91 व्या आवृत्तीचे नेतृत्व केले. या वेळी त्यांनी आशियाई खेळ 2026 मध्ये सहभागी झालेल्या
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया


नागोया(जपान), 20 सप्टेंबर (हिं.स.)केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जपानमधील नागोया येथील मेईजो पार्क येथे 'संडेज ऑन सायकल'च्या 91 व्या आवृत्तीचे नेतृत्व केले. या वेळी त्यांनी आशियाई खेळ 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय समुदायाला एकत्र आणले.

हा उपक्रम क्रीडा क्षेत्राच्या जागतिक भाषेच्या माध्यमातून भारतीय समुदायाशी असलेले परस्परसंबंध अधिक दृढ करण्याच्या आणि 'फिट इंडिया' मोहिमेअंतर्गत आरोग्यदायी जीवनशैली व तंदुरुस्तीचा संदेश पोहोचवण्याच्या भारत सरकारच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग होता.

डॉ. मांडविया यांनी 'संडेज ऑन सायकल'च्या 91 व्या आवृत्तीतील सहभागींशी संवाद साधला आणि आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांच्या उत्साहाचे कौतुक केले.

आशिया खंडातील या सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर सहभागी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी आणि 'भारताचा उत्साह वाढवण्यासाठी' नागोया येथील भारतीय समुदाय 'संडेज ऑन सायकल'च्या माध्यमातून एकत्र आला.

नागोया येथील भारतीय नागरिकांनी या स्पर्धेत 'टीम इंडिया'ला दाखवलेल्या अढळ पाठिंब्याची दखल घेत डॉ. मांडविया यांनी त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहाची प्रशंसा केली.जपानमधील नागोया येथे आशियाई खेळांना सुरुवात झाली असून भारताचे 500 हून अधिक तरुण खेळाडूंचे पथक या स्पर्धेत सहभागी झाले आहे, असे डॉ. मांडविया या वेळी म्हणाले.

भारतीय समुदायाने 'संडेज ऑन सायकल' उपक्रमात सहभागी होऊन आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी मोठा प्रतिसाद दर्शवला असल्याचे ते पूढे म्हणाले. मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आपले क्रीडापटू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि येथील भारतीय नागरिक त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मोलाचे योगदान देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. मांडविया आशियाई खेळ 2026 साठी जपानमधील नागोया येथे उपस्थित असून, ते भारतीय खेळाडू, अधिकारी आणि भारतीय समुदायातील घटकांशी थेट संवाद साधत आहेत. यातून क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याची आणि जागतिक स्तरावर अधिक निरोगी व तंदुरुस्त भारत घडवण्याची सरकारची कटिबद्धता दिसून येते.

'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' या उपक्रमाचे आयोजन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (MYAS), सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI), राहगिरी फाउंडेशन आणि 'माय भारत' (MY Bharat) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande