रत्नागिरी : बस फलाटावर लावताना अपघात; तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत
रत्नागिरी, 20 सप्टेंबर (हिं.स.) । साखरपा बसस्थानकात एसटी बस फलाटावर लावत असताना बसच्या पुढील चाकाचा धक्का लागल्याने एका तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या चसुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर डेपोची रत्ना
रत्नागिरी : बस फलाटावर लावताना अपघात; तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत


रत्नागिरी, 20 सप्टेंबर (हिं.स.) । साखरपा बसस्थानकात एसटी बस फलाटावर लावत असताना बसच्या पुढील चाकाचा धक्का लागल्याने एका तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या चसुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर डेपोची रत्नागिरी-कोल्हापूर एमएच १२ झेड ई ८९५३ क्रमांकाची शिवाई बस साखरपा बसस्थानकातील फलाटावर लावण्यात येत होती. याचवेळी मोर्डे-लाडवाडी येथील संजय रामचंद्र मांडवकर (वय ३८) यांचा तोल गेल्याने ते बसच्या पुढील बाजूला आले. त्यांना बसच्या पुढील चाकाचा धक्का लागल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे यांच्या मदतीने जखमी संजय मांडवकर यांना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. महेश चाचणे ( रा. हुपरी) असे बसचालकाचे नाव आहे. प्राथमिक उपचारानंतर मांडवकर यांच्या पायाला झालेली दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande