आमदार रोहित पवार यांनी धाराशिवमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला
धाराशिव, 20 सप्टेंबर (हिं.स.)। आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक वीजही नियमित मिळत नसल्याने त्यांची अडचण आणखी वाढली आहे. वारंवार होण
अ


धाराशिव, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक वीजही नियमित मिळत नसल्याने त्यांची अडचण आणखी वाढली आहे.

वारंवार होणारे लोडशेडिंग, अनियमित वीजपुरवठा आणि मिळणाऱ्या विजेच्या वेळेतील अनिश्चितता यामुळे उपलब्ध पाण्याचा उपयोग करूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. पाऊस नाही आणि वीजही नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

पिकांचे नुकसान, पाणी आणि वीज या शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande