उद्यापासून शिक्षक समन्वय संघाचे बेमुदत निर्धार धरणे आंदोलन
परभणी, 20 सप्टेंबर (हिं.स.)। विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोमवारप
उद्यापासून शिक्षक समन्वय संघाचे बेमुदत निर्धार धरणे आंदोलन


परभणी, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोमवारपासून (दि.२१) आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत निर्धार धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते प्रा. किरण सोनटक्के यांनी केले आहे.विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार दरवर्षी २० टक्के अनुदानाचा टप्पा देण्यात यावा, पात्र शाळांना समान टक्केवारीने अनुदान देण्यात यावे, पटसंख्येच्या निकषामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शाळांना न्याय मिळायला हवा, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेचा निकष पूर्ववत ठेवण्यात यावा, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित सेवेत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशा विविध मागण्यांचा समावेश करणे, यांचा समावेश आहे.राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निर्धार आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन किरण सोनटक्के यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande