
इस्लामाबाद , 23 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देणाऱ्या या देशालाच आता अशी भीती सतावत आहे की, या संघटना पाकिस्तानच्या विनाशाचे कारण ठरू शकतात. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी देशात वाढत असलेल्या दहशतवादाची कबुली दिली आहे. जैश आणि लष्करमुळे पाकिस्तानची अवस्था सीरिया आणि इराकसारखी होऊ नये, अशी भीती ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या पॉडकास्टवर संवाद साधताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “हे लोक शस्त्रे हाती घेतात आणि आपले स्वरूप बदलतात. कधी ते अमेरिकेची लढाई लढू लागतात, तर कधी स्वतःची किंवा दुसऱ्या कोणाची लढाई लढतात.”या दहशतवादी संघटनांना ‘फ्रँचायझी’ संबोधत ख्वाजा आसिफ म्हणाले, “सीरियाची काय अवस्था झाली, इराकची काय अवस्था झाली, ते पाहा. देव न करो, कुठेतरी आपलीही अवस्था तशीच होऊ नये. या संघटना तुमच्या लष्कराची ताकद कमी करतात.”
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी जैश आणि लष्कर या संघटनांची तुलना अशा क्षेपणास्त्रांशी केली, जी त्यांच्या स्वतःच्या देशातही स्फोट घडवू शकतात.ख्वाजा आसिफ म्हणाले, “पाकिस्तानला या मिलिशियांची गरज नाही. ही अनियंत्रित क्षेपणास्त्रे आहेत आणि त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. पाकिस्तानच्या गेल्या ४०-५० वर्षांच्या इतिहासाने हे सिद्ध केले आहे.”
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या भाषणातील एक भाग पुन्हा चर्चेत आला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेतील त्यांच्या आगामी भाषणाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.या व्हिडिओमध्ये शहबाज शरीफ यांना २० सप्टेंबर २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या अधिवेशनात असे म्हणताना ऐकू येते, “जर आम्ही या दहशतवाद्यांचा सामना केला नसता, तर ते न्यूयॉर्क आणि लंडनच्या रस्त्यांवर फिरत असते आणि कदाचित सुदूर पूर्वेपर्यंतही कुठे कुठे पोहोचले असते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode