आशियाई क्रीडा स्पर्धा: जय मीनाने सॉफ्ट टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकत रचला इतिहास
नागोया(जपान), 23 सप्टेंबर (हिं.स.) । भारताच्या जय मीनाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. त्याने फिलिपिन्सच्या शेर्विन न्गुटला सात गेमच्या सामन्यात पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि आपले पदक निश्चित केले
जय मीना


नागोया(जपान), 23 सप्टेंबर (हिं.स.) । भारताच्या जय मीनाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. त्याने फिलिपिन्सच्या शेर्विन न्गुटला सात गेमच्या सामन्यात पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि आपले पदक निश्चित केले. मात्र, उपांत्य फेरीत जय मीना जपानच्या ताकाया कुरोसाकाकडून ३-५, १-४, १-४, ४-१, ६-४, १-४ अशा फरकाने पराभूत झाला. यामुळे अंतिम फेरीत पोहोचून पदकाचे चित्र बदलण्याची त्याची संधी हुकली. तथापि, त्याच्या या यशामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले.

मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला जय मीना तिसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने २०१८ आणि २०२२ मध्येही सहभाग घेतला होता. त्याने गट 'डी' मध्ये पाकिस्तानच्या अरायन हुसेनला ४-० ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर त्याने शेर्विन न्गुटला ४-३ (०-४, ४-२, २-४, ४-२, ५-३, २-४, ७-५) ने मात देत उपांत्य फेरी गाठली होती.

जयने, आध्या तिवारीसोबत २०२४ च्या जागतिक सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते. जागतिक चॅम्पियनशिपमधील हे भारताचे पहिले पदक होते. त्यानंतर, २०२५ मध्ये, जयने आशियाई सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून इतिहास रचला आणि एकूण चार पदके पटकावली.

सॉफ्ट टेनिस म्हणजे काय..?

हा खेळ पारंपरिक टेनिससारखाच दिसतो, पण त्याचा चेंडू अधिक मऊ आणि हलका असतो. या खेळाचा उगम जपानमध्ये झाला आणि तो संपूर्ण आशियामध्ये खेळला गेला. नंतर, सॉफ्ट टेनिस पूर्व युरोपमध्येही लोकप्रिय झाला. या चेंडूसाठी टेनिससारखाच रबर वापरला जातो, पण मऊ टेनिस चेंडूला आवरण नसते. यामुळे चेंडू खूप हलका होतो, जास्त फिरतो आणि हवेत जास्त वेळ तरंगतो. पूर्वी हा खेळ फक्त दुहेरीमध्ये खेळला जात असे. नंतर, एकेरीचे सामनेही सुरू झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande