
बीड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन, बीड व शारदा स्पोर्ट्स अकॅडमी, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बीड जिल्हा कुमार व कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी रणवीर अमरसिंह पंडित यांनी
उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. मैदानावर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis