
परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे असमान प्रमाण, पिकांचे नुकसान आणि शेतीसमोरील वाढती आर्थिक अडचण यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व कष्टकरी वर्गाला शासनाने तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतीमालाचे उत्पादन, पावसाची अनिश्चितता दूर करावी, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनरर दोन लाख रुपये अनुदान द्यावे, भूमिहीन शेतमजुरांना ५० हजार रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर कॉ. बळीराम वन्हाडे पाटील, कॉ. भारत गायकवाड, कॉ. भारत फुके, कॉ, दिपकराव लिपणे कॉ. आबासाहेब, गिराम, कॉ. बाळासाहेब गिराम, कॉ. दत्ताराव झुके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis