मंत्री अतुल सावे यांनी अनुभवली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची दाहकता
छत्रपती संभाजीनगर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। मौजे वाघला, ता. वैजापूर शिवारात पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार, मा. ना. अतुलजी सावे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची दाहकता
Q


छत्रपती संभाजीनगर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। मौजे वाघला, ता. वैजापूर शिवारात पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार, मा. ना. अतुलजी सावे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष अनुभवली.

डोळ्यांसमोर करपलेली पिके… पाण्याच्या प्रतीक्षेत कोरडी पडलेली जमीन… आणि कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर करपताना पाहणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू… हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.

यावेळी शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा, अडचणी आणि चिंता जाणून घेतल्या. त्यांच्या वेदना ऐकताना या संकटाची तीव्रता मनापासून जाणवली.

संकट मोठे आहे, पण बळीराजा एकटा नाही. त्याच्या कष्टाची आणि वेदनेची जाणीव ठेवून शासन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी, जि.प. अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, माजी जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, सुनील पैठणपगारे, ज्ञानेश्वर जगताप, संदीप ठोंबरे, धनंजय धोर्डे, नारायण तुपे,नारायण कवडे, कैलास पवार, प्रेम राजपुत,दिनेश राजपूत,अशोक शेळके, शैलेश पोंदे,प्रविण सोमवंशी अमोल मलीक यांच्यासह पदाधिकारी व प्रामुख्याने परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande