
पुणे, 24 सप्टेंबर, (हिं.स.) ३८ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या प्रतिष्ठेच्या 'मिस पुणे फेस्टिव्हल' स्पर्धेत आकृती शृंगारे ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. श्रावणी पवार आणि पूर्वा भिडे या रनरअप ठरल्या. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती तरिता शंकर आणि पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते विजेत्यांना मुकुट प्रदान करण्यात आला.
डेंटल वर्ल्डचे डॉ. केदार व पल्लवी पाठक यांनी दंत चिकित्सा करून बेस्ट स्माईल श्रावणी पवार ही विजेती ठरली. डिजिटल टास्क फोर्स तर्फे घेतल्या गेलेल्या रीलस स्पर्धेतुन सायबर सेफ क्वीन साठी सोनिया साठेची निवड केली गेली. अश्विन कोडगुले यांनी फोटोशूट करून मिस फोटोजेनिकसाठी आकृती श्रींगारेची निवड केली. बेस्ट टॅलेंटसाठी संज्योत राऊलवारची निवड झाली. तर प्रेक्षकातून चिठ्ठ्यांतून मतदान घेऊन *मिस फेव्हरेट* म्हणून सोनिया साठे या तरुणीचे नाव घोषित केले गेले.
इंदिरा इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शान मेहेंदळे, प्रख्यात अभिनेत्री सानिया चौधरी, अभिनेता आणि मॉडेल अजित शिधये आणि फॅशन कोरिओग्राफर आणि दिगदर्शक जुई सुहास यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.टी एस प्रस्तुत मिस पुणे फेस्टिवल २०२६ चे दिग्दर्शन जुई सुहास तर ग्रूमिंग व कोरिओग्राफर म्हणून फाल्गुनी झेंडे यांनी काम पाहिले. संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांनी ही माहिती दिली.
वारसा या संकल्पनेवर आधारित १५ अंतिम स्पर्धक मुलींनी आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॅाक, स्वतःची ओळख, प्रश्न उत्तरे अशा विविध फेऱ्या पार केल्या. यामधून ३ विजेत्या तरुणींची निवड झाली. या १५ स्पर्धक तरुणींसाठी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले, फोटोशूट , दंत चिकित्सा, ब्युटी ट्रीटमेंट, नेल आर्ट, फिटनेस तसेच सायबर सुरक्षा ,हेरिटेज वॉक, अशा अनेक गोष्टींचा ही यात समावेश होता.
----
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु