परभणी - चारठाणा येथे तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद
परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)। चारठाणा येथील करपरा नदीवरील निजामकालीन पुल जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर नदीपात्रातील दूषित पाणी साचून ते पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत जात असल्याने ग्रामपंचायतीने गावातील पाणीपुरवठा बंद केला आहे. करपरा नदीवर असलेला जूना
परभणी - चारठाणा येथे तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद


परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

चारठाणा येथील करपरा नदीवरील निजामकालीन पुल जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर नदीपात्रातील दूषित पाणी साचून ते पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत जात असल्याने ग्रामपंचायतीने गावातील पाणीपुरवठा बंद केला आहे.

करपरा नदीवर असलेला जूना पुल मागच्या आठ दिवसापूर्वी पाडून तेथे नवीन पुलाचे बांधकाम होणार असल्याने पर्यायी रस्ता तयार केल्यानंतर तेथे नदीपात्रातील दुषित पाणी थांबत असून ते पाणी नदीपात्रात असलेल्या लहान विहीरीतून बाजूला असलेल्या मोठ्या विहीरीत जात आहे. परिणामी गावाला दुषित पाणीपुरवठा होऊन रोगराई पसरू नये म्हणून खबरदारी घेतली असून ग्रामपंचायतीने मागच्या तीन दिवसापासून गावातील पाणीपुरवठा बंद केला आहे. दरम्यान काम करणार्या यंत्रणेकडून नदीपात्रात पर्यायी रस्त्याच्याखाली मोठे बांगडी पाईप टाकून पाणी काढले नसून त्यामुळे ही परिस्थिती उदभवली असल्याचे समजते. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. व्हि. ढोणे व ग्रामविकास अधिकारी डि. आर. कांगणे यांनी भेट देऊन दुषित पाणी तातडीने काढण्याचे आदेश संबधिताना दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande