आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वात मॅरेथॉन आढावा बैठका
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। मतदारसंघातील विविध विकासकामांना अधिक गती मिळावी आणि मंजूर निधीतून सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत, गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, या उद्देशाने आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या मॅरेथॉन
अ


बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)।

मतदारसंघातील विविध विकासकामांना अधिक गती मिळावी आणि मंजूर निधीतून सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत, गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, या उद्देशाने आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या मॅरेथॉन आढावा बैठकीस उपस्थित राहून विविध विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची विभागनिहाय माहिती घेण्यात आली.

माजलगाव व वडवणी क्रीडा संकुल, रस्ते, पूल, शादीखाना, आरोग्य केंद्रे, गावांतर्गत सिमेंट रस्ते, सभामंडप, पर्यटन क्षेत्र विकास आदी महत्त्वाच्या विकासकामांची सद्यस्थिती, कामाची प्रगती, प्रलंबित बाबी आणि कामे पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

ज्या कामांची गती अपेक्षेप्रमाणे नाही, अशा कामांना तातडीने गती देऊन विहित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये आणि नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande