छ. संभाजीनगर - भूमचे आरटीओ शिबिर आता २२ सप्टेंबरला
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। वाहनविषयक विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासू नये आणि त्यांच्या वेळेसह प्रवासाचा त्रास वाचावा,यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्यामार्फत दरमहा तालुकास्तरीय
छ. संभाजीनगर - भूमचे आरटीओ शिबिर आता २२ सप्टेंबरला


छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। वाहनविषयक विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासू नये आणि त्यांच्या वेळेसह प्रवासाचा त्रास वाचावा,यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्यामार्फत दरमहा तालुकास्तरीय शिबिर कार्यालयांचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार भूम येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेले शिबिर आता प्रशासकीय कारणास्तव मंगळवार,२२ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने भूम येथील नियोजित शिबिर कार्यालयाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.आता हे शिबिर २२ सप्टेंबर रोजी नियोजित ठिकाणी भूम येथे आयोजित करण्यात येणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित कामांसाठी तालुकास्तरीय शिबिराची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी पूर्वीच्या १७ सप्टेंबर या तारखेऐवजी २२ सप्टेंबर ही सुधारित तारीख लक्षात घ्यावी.गैरसोय टाळण्यासाठी सर्व संबंधित नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande