रायगड : ऑनलाईन वसतिगृह प्रवेश अर्जास 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार (OBC/SBC/VJNT/NT-A, B, D) व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत (NT-C) ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्
V


रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)।

शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार (OBC/SBC/VJNT/NT-A, B, D) व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत (NT-C) ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता वेळापत्रकात दि.15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी दिली आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार (OBC/SBC/VJNT/NT-A,B,D) व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत (NT-C) 12 वी नंतर सन 2026-27 या वर्षातील व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन https://hmasnew.mahait.org, राबविण्यासाठी वसतिगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यवसायिक विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना काही तांत्रिक अडचण येत असल्यास सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande