कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरेची झलक दाखवणारे महापौर दालन सज्ज
कोल्हापूर, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। कोल्हापूरच्या प्रथम नागरिकपदाचा मान भूषविणाऱ्या भाजपा व महायुतीच्या पहिल्या महिला महापौर रुपाराणी निकम यांच्या नूतनीकरण झालेल्या आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरेची झलक दाखवणाऱ्या महापौर
कोल्हापूर महापौर दालनाचा उदघाटन समारंभ


कोल्हापूर, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। कोल्हापूरच्या प्रथम नागरिकपदाचा मान भूषविणाऱ्या भाजपा व महायुतीच्या पहिल्या महिला महापौर रुपाराणी निकम यांच्या नूतनीकरण झालेल्या आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरेची झलक दाखवणाऱ्या महापौर दालनाचा उदघाटन समारंभ राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पार पडला.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरेची झलक या महापौर दालनात आकर्षक पद्धतीने साकारण्यात आली आहे. महापौर दालनात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोल्हापूरच्या गौरवशाली इतिहासाची आणि ओळखीची साक्ष अनुभवता यावी, या उद्देशाने दालनाला वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप देण्यात आले आहे.

यावेळी महापौर रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळो आणि स्वच्छ, प्रगत कोल्हापूरचे स्वप्न लवकरात लवकर साकार होवो, कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांची वाटचाल यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो, ही सदिच्छा खा. महाडिक यांनी व्यक्त केल्या.

यावेळी महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भारूड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिरळे, गटनेता भाजपा मुरलीधर जाधव, शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख, उद्योजक, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन संग्राम निकम, राहुल चिकोडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका महापालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande