
यवतमाळ, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित वसतिगृहाची तपासणी गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. परंतु तपासणीपूर्वीच वसतिगृहे चालकांनी परिस्थिती ‘ऑल ईज वेल’ केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. आता तपासणी मुख्य कार्यकारी अधिकार्!यांसह आयुक्तालयात पाठविण्यात येणार आहे. तद्नंतर वसतिगृहाबाबत अंतिम निर्णय घेतल्या जाईल.
गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रम शाळेतील मुलींचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर
आदिवासी आश्रम शाळा, वसतिगृहातील भौतिक सोयीसुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थीच नव्हे, तर पालकसुद्धा असुविधांमुळे त्रस्त आहे. सातत्याने घडणार्!या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावर उपाय योजना कराव्यात, अशी मागणी कुणाकडे करावी, असा प्रश्नही विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला होता. या समस्यांची दखल खुद्द शासनस्तरावरूनच घेण्यात आली. आणि आश्रम शाळा तसेच वसतिगृहातील भौतिक सोयीसुविधांची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या १७४ पैकी १४४ वसतिगृह तपासणीची यादी समाजकल्याण विभागाला प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या यादीनुसार जिल्हा परिषद समाजकल्याण तसेच पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकार्!यांच्या अधिनस्त तपासणीला सुरवात झाली आहे. तपासणीअंती चौकशी अहवाल आयुक्तालयाच्या अॅपवर तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्!यांकडे सादर केला जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२० हून अधिक वसतिगृहाची तपासणी आटोपली आहे. परंतु तपासणीपूर्वीच वसतिगृह ‘ऑल ईज वेल’ करण्याचा खटाटोप चालकांनी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या तपासणीत वसतिगृहाची मान्यता, विद्यार्थी पटसंख्या, विद्यार्थ्यांची हजेरी, इमारत, स्वच्छतागृह, स्नानगृहे, झोपणे, जेवण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसरातील स्वच्छता, अग्निक्षमण यंत्र, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आदींची तपासणी अधिकारी, कर्मचार्!यांनी केली आहे. तपासणी अहवाल आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला असून, आता आवश्यक उपाययोजना केल्या जाणार की नाही, ही येणारी वेळच सांगेल.
३४ वसतिगृहांवर बोंबाबोंब?
जिल्हा परिषदेच्या वसतिगृहाची अवस्था अतिशय बिकट आहे. तपासणी केल्या जाणार असल्याची कुणकूण लागताच अनेकांनी आवश्यक उपाययोजना केल्या. तर काहींनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. अशा जवळपास ३४ वसतिगृहांवर बोंबाबोंब असल्याची कुरबूर वसतिगृह चालकांमध्ये आहे. मात्र, प्रशासनाने या बाबीला दुजोरा दिला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी