उष्णतेशी दोन हात करण्यासाठी नाशिक महापालिका एनआरडीसीशी पाच वर्षांचा करार
नाशिक, 03 सप्टेंबर (हिं.स.)। - नाशिकमध्ये वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आता महापालिकेने शाश्वत आणि संशोधनाधारित उपाययोजनांकडे पाऊल टाकले आहे. नाशिक महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि एनआरडीसी इंडिया यांच्यात पाच वर्षांसाठी महत्वपूर्ण सामंजस्
Municipal corporation signs


नाशिक, 03 सप्टेंबर (हिं.स.)।

- नाशिकमध्ये वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आता महापालिकेने शाश्वत आणि संशोधनाधारित उपाययोजनांकडे पाऊल टाकले आहे. नाशिक महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि एनआरडीसी इंडिया यांच्यात पाच वर्षांसाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

वाढती उष्णता, उष्णतेच्या लाटा आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शहराची हीट रिसिलिअन्स क्षमता वाढविणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. महापौर आयुक्त मनीषा खत्री, उपायुक्त (पर्यावरण) डॉ. संगीता नांदूरकर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आयुक्त खत्री आणि एनआरडीसी इंडियाच्या कंट्री हेड दीपा बगई यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एनआरडीसीकडून उष्णतेशी संबंधित धोके कमी करण्यासाठी शहराला तांत्रिक व सल्ला गार सहकार्य दिले जाणार आहे. एनआरडीसी इंडिया शहरांच्या उष्णता-प्रतिरोधक नियोजनासह कूल रूफ, हवामान अनुकूलन आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित उपाययोजनांवर काम करते.

सिंहस्थासाठी स्वतंत्र हीट प्लॅन आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात उष्णतेचा संभाव्य ताण लक्षात घेऊन पर्यावरणपूरक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येणार आहे. विशेषतः उन्हात काम करणारे कामगार, फेरीवाले, स्वच्छता कर्मचारी, झोपडपट्टीतील नागरिक, महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उष्णतेपासून संरक्षण देणाऱ्या उपाययोजना राबविण्यावर भर असेल. सार्वजनिक ठिकाणी सावली, पाणी, शीतकरणाच्या सुविधा, जनजागृती तसेच उष्ण-तेशी संबंधित आरोग्यधोक्यांबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. अशा प्रकारच्या उपाययोजनांमध्ये असुरक्षित घटकांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे हवामान-आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचेही मत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande