बीडमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा!
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे, AHTU आणि शिवाजीनगर पोलिसांच्या पथ
पोलीस कारवाई


बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे, AHTU आणि शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ३ हजार रुपये रोख आणि ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध पिटा कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande