

रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
कर्जत-खालापूर मतदारसंघातील औद्योगिक शांतता, स्थानिकांचा रोजगार आणि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
टाटा स्टील आणि गोदरेज अँड बॉयस कंपनीच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, क्षेत्रातील औद्योगिक वातावरण सुरळीत राहावे आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या संधी सुरक्षित राहाव्यात यासाठी सविस्तर चर्चा केली.
तसेच या विषयावर मंत्रालय किंवा वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर कोणतीही समन्वय बैठक आयोजित करण्यात आल्यास स्थानिक परिस्थिती आणि वास्तव मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना सहभागी करून घेण्यात यावे, ही मागणी केली.
या भेटीनंतर या संदर्भात तात्काळ बैठक आयोजित करावी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले व मला अवगत करावे ही विनंती केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)