स्टेनोग्राफर पदभरतीवरील बंदी उठविण्याची मागणी
नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण नांदेड, ३ सप्टेंबर (हिं.स.)। राज्य सरकारने ५ मे २०२६ रोजी जारी केलेल्या स्टेनोग्राफर पदभरतीसंदर्भातील शासन निर्णयाच्या (जीआर) विरोधात भगवान पवार (पिंपळकौठा मगरे) यांच्यासह काही व
अ


नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

नांदेड, ३ सप्टेंबर (हिं.स.)। राज्य सरकारने ५ मे २०२६ रोजी जारी केलेल्या स्टेनोग्राफर पदभरतीसंदर्भातील शासन निर्णयाच्या (जीआर) विरोधात भगवान पवार (पिंपळकौठा मगरे) यांच्यासह काही विद्यार्थी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषणाला बसले आहेत.

या आंदोलनाची दखल घेत भाजप आमदार अमरनाथ राजुरकर यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलक विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी आमदार राजुरकर यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या प्रमुख मागण्या समजून घेतल्या. स्टेनोग्राफर पदभरतीवरील बंदी तात्काळ उठविण्यात यावी, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार अमरनाथ राजुरकर यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिले. तसेच होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या भेटीदरम्यान नांदेड युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande