बीड - गुरुवारचा आठवडी बाजार सोमवारी भरणार
बीड, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। बीड जिल्हा बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथे दर गुरुवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर हा आठवडी बाजार सोमवारी भरविण्यात येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना देण्य
बीड - गुरुवारचा आठवडी बाजार सोमवारी भरणार


बीड, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। बीड जिल्हा बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथे दर गुरुवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला.

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर हा आठवडी बाजार सोमवारी भरविण्यात येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. लिंबागणेश येथील किरकोळ व घाऊक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, विविध व्यावसायिक तसेच शाळांनीही बंदमध्ये सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला.

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर हा आठवडी बाजार सोमवारी भरविण्यात येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande