व्यापारांनी निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून मराठा बांधवांच्या आंदोलनास दिला पाठिंबा
लातूर, 03 सप्टेंबर (हिं.स.) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. परंतु शासन दरबारी अजून कुठलाही निर्णय झाला नसून मनोज दादा यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आह
कडकडीत बंद


लातूर, 03 सप्टेंबर (हिं.स.) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. परंतु शासन दरबारी अजून कुठलाही निर्णय झाला नसून मनोज दादा यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे या सरकारच्या निषेधार्थ निलंगा येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले. तसेच आज पुकारण्यात आलेले बंद सर्व निलंगातील व्यापाऱ्यांनी सहकार्य करत स्वतःहून दुकाने बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

लातूर ते निलंगा या मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा बांधवांनी आज सकाळी दहा वाजताच रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनास निलंगा तालुक्यातील मोठ्या संख्येने सकल मराठा बांधवांची उपस्थिती होती यावेळी मराठा बांधवांनी सरकारच्या विरोधात तीव्र निषेध केला. व मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सकल मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande