मंगळवेढ्यात दुष्काळाची भीषण छाया; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। ऑगस्ट महिना संपला तरी पावसाने दडी मारल्याने मंगळवेढा तालुक्यात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे हातातून गेला असून, जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ग
मंगळवेढ्यात दुष्काळाची भीषण छाया; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर


सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। ऑगस्ट महिना संपला तरी पावसाने दडी मारल्याने मंगळवेढा तालुक्यात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे हातातून गेला असून, जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाची भूमिका उदासीन असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून, प्रशासकीय पातळीवरील उपाययोजनांच्या संथ गतीमुळे नाराजी वाढत आहे.

तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाने तीव्र ओढ दिल्याने सुमारे ३५ हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या. ज्या भागात काही प्रमाणात पेरण्या झाल्या, त्या पिकांनाही पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी उभी पिके जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाअभावी विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. नदीकाठी पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता आले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

सध्या उजनी कालव्याचा परिसर काहीसा आशादायक असला, तरी तालुक्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्याप कोरडे असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande