पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य सहाय्यकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा
पुणे, 03 सप्टेंबर (हिं.स.)।कर्मचारी सेवेला न्याय देतानाच प्रशासनात पारदर्शकता राखण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सहाय्यिकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया समुपदेशनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. जि
पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य सहाय्यकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा


पुणे, 03 सप्टेंबर (हिं.स.)।कर्मचारी सेवेला न्याय देतानाच प्रशासनात पारदर्शकता राखण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सहाय्यिकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया समुपदेशनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात झालेल्या या प्रक्रियेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर झाला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल कृष्णराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली दीपक हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्या नियोजनातून पदोन्नतीची प्रक्रिया सुसूत्र आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

पदोन्नती प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना उपलब्ध पदे, सेवाज्येष्ठता तसेच पदोन्नतीनंतरचे संभाव्य सेवा स्थळ याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली. समुपदेशनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या शंका आणि अडचणींचे निरसन करण्यात आले.या पद्धतीमुळे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. पदोन्नती प्रक्रियेतील विविध बाबींबाबत कर्मचाऱ्यांना थेट माहिती मिळाल्याने प्रक्रिया अधिक पारदर्शक झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande