सोलापूरच्या जुना पुणे नाका-बोरामणी नाका उन्नत मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानच्या चारपदरी उन्नत मार्गिकेला आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे प्रकल्प
सोलापूरच्या जुना पुणे नाका-बोरामणी नाका उन्नत मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी


सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानच्या चारपदरी उन्नत मार्गिकेला आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकल्पासाठी विविध शासकीय विभागांच्या जमिनी कोणतेही भोगवटा मूल्य न आकारता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाची कार्यवाही अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार प्रकल्पाची निकड आणि त्यासंदर्भातील विविध बाबींची पडताळणी करून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सोलापूर शहरातून जाणारा जुना पुणे नाका ते बोरामणी नाका हा मार्ग शहरातील तसेच आंतरराज्यीय वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावर उपाय म्हणून चारपदरी उन्नत मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

उन्नत मार्गासोबत आवश्यक त्या ठिकाणी सेवा रस्ता आणि पोच मार्गही विकसित करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande