सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन मॉडर्न, तीन आदर्श शाळा
सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन मॉडर्न आणि तीन आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. सीईओ कुशल जैन यांनी सांगित
ZP CEO


सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन मॉडर्न आणि तीन आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सीईओ कुशल जैन यांनी सांगितले की, पीएम श्री योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक शाळा मॉडर्न करण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत आणखी एका शाळेचा आधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात तीन आदर्श शाळा विकसित करण्याचे नियोजन आहे.

याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून, या उपक्रमाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

मॉडर्न आणि आदर्श शाळांच्या विकासासोबतच जिल्ह्यातील इतर शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी जिल्ह्याला सहा कोटी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी सहा कोटी २१ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. निधी वाटपाच्या बाबतीत सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची माहितीही कुशल जैन यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande