बोरामणी जिल्हा परिषद गटातील शेतकरी संतप्त; उळे उपकेंद्रासमोर पहाटेपासून आंदोलन
सोलापूर, ३ सप्टेंबर (हिं.स.)। कृषी पंपांसाठी सध्या केवळ पाच तासांचा वीजपुरवठा होत असून, त्यातही वारंवार ट्रिपिंग आणि वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे बोरामणी जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. या समस्येविरोधात गुरुवारी पहाटे उळे येथील
sdfg


सोलापूर, ३ सप्टेंबर (हिं.स.)। कृषी पंपांसाठी सध्या केवळ पाच तासांचा वीजपुरवठा होत असून, त्यातही वारंवार ट्रिपिंग आणि वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे बोरामणी जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. या समस्येविरोधात गुरुवारी पहाटे उळे येथील महावितरण उपकेंद्रासमोर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

नेहमीच्या वेळेनुसार पहाटे तीन वाजता वीजपुरवठा सुरू होईल, या अपेक्षेने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतात गेले होते. मात्र, निर्धारित वेळ उलटून गेल्यानंतरही वीजपुरवठा सुरू झाला नाही. तास-दीड तास प्रतीक्षा करूनही वीज न आल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला.

यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी उळे येथील महावितरण उपकेंद्रासमोर जमा झाले. यावेळी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकून वीजपुरवठ्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

गंगेवाडी, कासेगाव, उळे, उळेवाडी, वडजी, बक्षीहिप्परगा, बोरामणी, मुस्ती, तांदूळवाडी, पिंजरवाडी, संगदरी, वरळेगाव, मुळेगाव, दोड्डी आणि मुळेगाव तांडा परिसरातील शेतकरी वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कृषी पंपांसाठी अपुरा वीजपुरवठा, त्यातच वारंवार होणारे ट्रिपिंग आणि अचानक वीज खंडित होण्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होत नाही. यासोबतच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करतानाही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने कृषी पंपांचा वीजपुरवठा नियमित आणि सुरळीत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande