ऍडोबने अनिल चक्रवर्ती यांची सीईओपदी केली नियुक्ती
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी ऍडोबने अनिल चक्रवर्ती यांची कंपनीचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ते शांतनू नारायण यांची जागा घेतील. चक्रवर्ती १ डिसेंबरपासून आपल्या पदाची सूत्रे स
Adobe appointed Anil Chakravarthy as CEO


नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी ऍडोबने अनिल चक्रवर्ती यांची कंपनीचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ते शांतनू नारायण यांची जागा घेतील. चक्रवर्ती १ डिसेंबरपासून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील.

कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, अॅडोबने अनिल चक्रवर्ती यांची नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. चक्रवर्ती ०१ डिसेंबरपासून पदभार स्वीकारतील. ते गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या शांतनू नारायण यांची जागा घेतील.

दरम्यान, शांतनू नारायण कंपनीमध्ये कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले अनिल चक्रवर्ती सध्या ऍडोबच्या ग्राहक अनुभव व्यवस्थापन व्यवसायाचे आणि जागतिक विक्री संचालनाचे अध्यक्ष आहेत. नारायण यांनी म्हटले, ‘‘एआय आधारित युगात ऍडोबच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी अनिल चक्रवर्ती हे योग्य व्यक्ती आहेत, असा मला पूर्ण विश्वास आहे. कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझ्या नव्या भूमिकेत त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.’’

चक्रवर्ती जानेवारी २०२० मध्ये ऍडोबशी जोडले गेले. त्यावेळी ऍडोबने त्यांची कंपनीच्या ‘डिजिटल एक्सपीरियन्स’ व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी कंपनीच्या जागतिक विक्री संचालनाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली. ऍडोबमध्ये सामील होण्यापूर्वी चक्रवर्ती चार वर्षे जागतिक एंटरप्राइझ क्लाउड डेटा व्यवस्थापन कंपनी ‘इन्फॉर्मॅटिका’चे सीईओ होते.

उल्लेखनीय म्हणजे, चक्रवर्ती यांनी वाराणसी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था बनारस हिंदू विद्यापीठ (आयआयटी बीएचयू) येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये तंत्रज्ञान विषयातील पदवी, तसेच मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विज्ञान विषयातील पदव्युत्तर आणि पीएचडीची पदवी मिळवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande