
धाराशिव, 05 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या २० ई-बस मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी ४ ई-बस कळंब आगारात दाखल झाल्या आहेत. शनिवारी या ई-बसचा लोकार्पण सोहळा शिवसेना खासदार ओम राजे निंबाळकर आणि शिवाजी अप्पा कापसे व अजित पिंगळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या अत्याधुनिक ई-बसच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis