बीड - भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सोशल मीडिया जिल्हा व तालुका संयोजकांच्या नियुक्त्या
बीड, 05 सप्टेंबर (हिं.स.)। भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सोशल मीडिया जिल्हा व तालुका संयोजकांच्या नियुक्त्या जाहीर करून, माझ्यासह जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सोशल मीडिया जिल
Q


बीड, 05 सप्टेंबर (हिं.स.)। भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सोशल मीडिया जिल्हा व तालुका संयोजकांच्या नियुक्त्या जाहीर करून, माझ्यासह जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी सोशल मीडिया जिल्हा संयोजकपदी अमोल वडतीले, बालाघाट मंडळ संयोजकपदी शाम राऊत तसेच बीड शहर संयोजकपदी शिवराज सिरसट यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हाभरातील सर्व सोशल मीडिया तालुका संयोजकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

सोशल मीडियाच्या प्रभावी माध्यमातून भाजपचे विचार, केंद्र व राज्य सरकारची विकासकामे आणि लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. तसेच राष्ट्रहिताच्या विरोधात अपप्रचार व दिशाभूल करणाऱ्या मोहिमांना तथ्यांच्या आधारे प्रभावीपणे प्रत्युत्तर द्यावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त केल्या. तसेच ओबीसी मोर्चाच्या बालाघाट मंडळ अध्यक्षपदी अशोक वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नवनाथआण्णा शिराळे, अजय सवाई, बालाघाट मंडळ अध्यक्ष अशोक रसाळ, सलिम जहांगीर, सुंदर चव्हाण, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, मिराताई गांधले, संध्याताई राजपूत, महादेव नागरगोजे, दादासाहेब नागरगोजे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande