
लातूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
: भारत सरकारच्या मेरा युवा भारत, लातूर आणि जेएसपीएम लातूरद्वारा संचालित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्टपासून घेण्यात आलेल्या 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना जेएसपीएम संस्थेच्या मैदानावरील कार्यक्रमात आज संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्याहस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय खेळाडू व एनआयएस प्रशिक्षक महेश पाळणे, आंतरराष्ट्रीय रायफल शूटर जागृती चंदनकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश पौळ, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शुभम स्वामी, मेरा युवा भारत लातूरचे संयोजक प्रशांत साबणे व मंगेश चिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधी, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि क्रीडा क्षेत्रातील करिअर याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis