रत्नागिरी, चिपळूण रेल्वे स्टेशन ते बस स्टँड बस सेवा सुरू करण्याची मागणी
रत्नागिरी, 5 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सव काळात रत्नागिरी आणि चिपळूण रेल्वे स्टेशन ते बस स्टँड यादरम्यान बस सेवा सुरू करण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने
एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन


रत्नागिरी, 5 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सव काळात रत्नागिरी आणि चिपळूण रेल्वे स्टेशन ते बस स्टँड यादरम्यान बस सेवा सुरू करण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.

गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने खासगी वाहतूक करणारे वाढीव दर लावून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी येत असतात. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी ग्राहक पंचायतीच अध्यक्ष संजय वैशंपायन आणि सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि एसटीचे विभाग नियंत्रक यांची भेट घेऊन प्रवासी ग्राहकांसाठी प्रवासाची सुविधा रास्त दराने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

एसटीचे विभाग नियंत्रक विश्वजित जानराव यांच्याशी या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा करण्यात आली असून रेल्वे स्थानकावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे तत्त्वतः मान्य करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांना रात्री अपरात्री रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर होणाऱ्या प्रवासाच्या अनुपलब्धतेच्या दृष्टीने गणेशोत्सव कालावधीमध्ये सतत शटल बस सेवा सुरू करण्यासाठी बसेस, मनुष्यबळ यांच्या उपलब्धतेचा विचार करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड अशी २४ तास सिटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक श्री. जानराव यांनी दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande