
जळगाव, 05 सप्टेंबर, (हिं.स.) स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. मात्र या ग्राहकांनी वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेऊन वीजचोरी केली. ऑगस्ट महिन्यात जळगाव विभागातील अशा 28 ग्राहकांवर महावितरणने थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.महावितरणकडून स्मार्ट मीटरद्वारे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केल्यानंतर ग्राहकाने बिल भरल्यास तात्काळ तो रिकनेक्ट केला जातो. मात्र काही ग्राहक ऑटो डिस्कनेक्शनंतरही बिले भरत नसल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले. हे ग्राहक खरोखर अंधारात आहेत की चोरून वीज वापरत आहेत याची पडताळणी करण्यासाठी जळगाव विभाग कार्यालयाने धडक मोहीम सुरू केली. यात तब्बल 28 ग्राहक बिल न भरताच अनधिकृतरीत्या वीज वापरताना आढळून आले.
या प्रकरणी सर्वांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपींमध्ये नशिराबाद येथील शेख इरफान शेख खलिल पिंजारी, शेख अजिम शेख युसूफ, भादली बु. येथील श्रीधर नारायण ठाकूर, नारायण विठ्ठल जावळे, गोपिकाबाई सखाराम पाटील, मोतीराम लक्ष्मण पाटील, शिवाजी कडू कोळी, जंगले सुपडू सपकाळे, उषाबाई गणेश कोळी, डोमगाव येथील मुरलीधर गिरधर महाले, दिगंबर प्रभाकर जाधव, जळगावातील प्रतिभा रितेश पवार, लक्ष्मी भानुदास बागडे, स्वप्नील प्रशांत सौंदाणे, देवीदास गणपतराव शिंदे, शेख रफिक हबीब, शाहरूख खान पठाण, संजय भगवान महाजन, अकीब शाह अब्दुल रहमान शाह, गणी चिंधा पटेल, शेख आरिफ बिस्मिल्ला, मोहंमद इरफान तांबोळी, शफी गफूर पटेल, शेख कय्युम हुसेनखा, दिलीप सूरजमल लाठी, नवीद जमील शेख, मनीषा विनोद जोशी व रसुबाई तुकाराम पाटील यांचा समावेश आहे.या सर्व संशयित आरोपींनी 11 हजार 606 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 2 लाख 69 हजार 575 रुपयांचे नुकसान केले. सर्व 28 संशयित आरोपींवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर