
जळगाव, 05 सप्टेंबर (हिं.स.) सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव यांच्या गणेश कॉलनी शाखेतील प्रशिक्षण सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव महेशकुमार गायकवाड यांनी दिली आहे. सहकारी संस्थांशी संबंधित सर्व लोकशाही दिन स्वतंत्रपणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार असून, यापुढे अशा स्वरूपाचा स्वतंत्र जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी याच ठिकाणी आयोजित करण्यात येईल. सहकारी संस्थांशी संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर