रत्नागिरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा, बस वाहतूकदार संघटनांसमवेत बैठक
रत्नागिरी, 5 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतूकदार संघटनांसोबत पोलीस व परिवहन विभागाची यांची संयुक्त बैठक पार पाडली. सर्व वाहनधारकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत याची खात्री
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठक


रत्नागिरी, 5 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतूकदार संघटनांसोबत पोलीस व परिवहन विभागाची यांची संयुक्त बैठक पार पाडली.

सर्व वाहनधारकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत याची खात्री करावी. सर्व रिक्षाधारकांनी त्यांची वाहने रिक्षा स्टॅण्ड वर शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा प्रकारे उभी करावीत. अवाजवी भाडेआकारणी करू नये, प्रवाशांशी उद्धट वर्तन करू नये, वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करू नये याबाबत त्यांना सूचित करण्यात आले. तसेच प्रवाशांच्या सोयीकरिता जिल्ह्यातील रेल्वेस्थानके व मुख्य रिक्षा थांब्यावरती परिवहन विभागामार्फत ठरवून देण्यात आलेल्या रिक्षा भाडेदराचे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

बस वाहनधारकांनी बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याचे सुनिश्चित करावे. चालक मद्यप्राशन करून व धोकादायक पद्धतीने बस चालविणार नाहीत याची खात्री संबंधित बसमालकांनी करावी. तपासणीत दोषी आढळल्यास चालक व मालक या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता बसेसच्या सुटण्याच्या वेळेचे नियोजन बसमालकांनी करावयाचे आहे. बसमालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाड्याची मागणी करू नये, याबाबत त्यांना सूचित करण्यात आले. त्यांना बस भाडेदर ठरवून देण्यात आले आहेत.

नागरिकांनीही अवाजवी भाडे आकारणी तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षा / बस वाहतूकदारांची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा ईमेल आयडी dyrto.08-mh@gov.in यावर वाहनाच्या व प्रवासाच्या तपशिलासह करावी.

बैठकीस अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande