रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 'आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर
रत्नागिरी, 5 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत २०२६-२७ या वर्षासाठी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या शिक्षक निवडीला अंतिम मान
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 'आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर


रत्नागिरी, 5 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत २०२६-२७ या वर्षासाठी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या शिक्षक निवडीला अंतिम मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.

या यादीत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील नऊ उत्कृष्ट शिक्षकांचा समावेश असून, एका शिक्षकाला विशेष कला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी अशी :

मंडणगड : नीलेश तुळशीराम लोखंडे (उपशिक्षक, जि. प. प्राथमिक मराठी शाळा तिडे आदिवासीवाडी)

दापोली : दिनेश कानू चिपटे (उपशिक्षक, जि. प. आदर्श शाळा भरणे खोंडारण)

खेड : दीप्ती दिलीप यादव (पदवीधर विषय शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा माणी क्र. १)

चिपळूण : विनोद जानू हुंबरे (पदवीधर शिक्षक, जि. प. शाळा चिवेली वरची)

गुहागर : प्रभू रघुनाथ हंबर्डे (उपशिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी)

संगमेश्वर : राजेश अर्जुन सावंत (पदवीधर शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पूर)

रत्नागिरी: रश्मी राजन वाडेकर (उपशिक्षका, जि. प. प्राथमिक आदर्श शाळा शिवार आंबेरे क्र. २)

लांजा : दिलीप शंकर चव्हाण (पदवीधर शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पन्हळे नं.१)

राजापूर : स्नेहा सुहास काडगे (उपशिक्षका, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाथर्डे)

यंदाच्या वर्षी संदेश प्रकाश झेपले (उपशिक्षक, जि. प. शाळा साडवली सह्याद्रीनगर) यांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल 'कला पुरस्कार' जाहीर झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande