
लंडन, 05 सप्टेंबर (हिं.स.)इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. अनेउरिन डोनाल्ड आणि वेगवान गोलंदाज हेन्री क्रोकोम्बे या दोन नवीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ग्लॅमॉर्गनकडून खेळणाऱ्या डोनाल्डचा टी-२० संघात, तर क्रोकोम्बेचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तो यापूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघात होता, परंतु अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. क्रोकोम्बेने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्सकडून खेळताना सलग दोन सामन्यांमध्ये हॅट-ट्रिक घेतली होती. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील मालिका १५ सप्टेंबर रोजी एका टी-२० सामन्याने सुरू होईल.
इंग्लंडने शेवटची एकदिवसीय आणि टी-२० मालिका भारताविरुद्ध खेळून जिंकली होती. त्या मालिकेसाठी इंग्लंडच्या टी-२० संघातून रेहान अहमद, जेकब बेथेल, सॅम करन, फिल सॉल्ट आणि ल्यूक वूड यांना वगळण्यात आले होते. त्यांच्या जागी गस ऍटकिन्सन, अनेउरिन डोनाल्ड, बेन डकॉट आणि जेमी ओव्हरटन यांचा समावेश करण्यात आला आहे. सोनी बेकर, जॉर्डन कॉक्स, हेन्री क्रोकोम्बे आणि ओव्हरटन यांचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर बेथेल, ब्रायडन कार्स, जेम्स कोल्स, करन आणि साकिब महमूद यांना वगळण्यात आले आहे. करन, सॉल्ट आणि बेथेल दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये डोनाल्डचा स्ट्राइक रेट २१४ आहे. गेल्या महिन्यात हंड्रेड लीगच्या अंतिम सामन्यात त्याने ट्रेंट रॉकेट्सकडून खेळताना १९ चेंडूंमध्ये ३८ धावा करून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळेच त्याची निवड झाली आहे. जेमी ओव्हरटन दुखापतीतून परतला आहे. हंड्रेड लीगमधील प्रभावी कामगिरीमुळे ऍटकिन्सन आणि डकेट यांचे संघात पुनरागमन झाले, तर कार्स, रेहान आणि वूड यांना वगळण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे